
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर त्यांच्या मोहाळा गावात चाकूने जीवघेणा हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार, गावातील राजकीय वादातून मतीन पटेल गटाने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय असंतोषातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांना प्रथम अकोटमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारांसाठी अकोल्याला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
