राजस्थानी सेवा संघाचे सशक्त संघटन व गौरवशाली परंपरा अबाधित राहील- आ.शर्मा व ज्ञानप्रकाश गर्ग यांचे मनोगत
राजस्थानी सेवा संघाची नूतन कार्यकारणी जाहीर अकोला– गत तीस वर्षांपासून जिल्ह्यात राजस्थानी सेवा संघ कार्यरत असून राजस्थानी समाजातील सर्व ज्ञातीचे सामूहिक सशक्तिकरण करीत समाजाचा उद्धार करिता हे संघटन अग्रेसर आहे. संघटनेच्या सर्व माजी अध्यक्षांनी संघटनेची गौरवशाली परंपरा जपलेली आहे. हीच गौरवशाली परंपरा सशक्त संघटनाच्या माध्यमातून सेवारत राहील अशी सदिच्छा आ. गोवर्धन शर्मा व अकोला जनता बँकेचे अध्यक्ष ज्ञानप्रकाश गर्ग यांनी आपापल्या मनोगतात व्यक्त केली.राजस्थानी सेवा संघाच्या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा स्थानीय अग्रसेन भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी आ.शर्मा व गर्ग मार्गदर्शक व अतिथी म्हणून बोलत होते. राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सेवा संघाचे माजी अध्यक्ष ऍड. मोतीसिंह मोहता,सीए रमेश चौधरी,सुनील वर्मा,श्यामसुंदर खंडेलवाल,मनोज बंब, निकेश गुप्ता,दिलीप खत्री, विजय तिवारी,मधुर खंडेलवाल,डॉ. जुगल चुरानिया, विजय पनपालिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमापूजन व मान्यवराच्या स्वागताने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी राजस्थानी समाजातील सर्व जाती समूहांना सोबत घेऊन सर्व समावेशक अशी कार्यकारणी जाहीर केली.यामध्ये राजस्थानी मोठे तीन घटकाचे अध्यक्ष पदसिद्ध उपाध्यक्ष म्हणून राहणार आहेत.या कार्यकारणीत उपाध्यक्षपदी विजय पनपालिया,डॉ आर बी हेडा, डॉ. जुगल जुगल चिरानिया,राजू अग्रवाल,विजय तिवारी,मधुर खंडेलवाल,प्रा सुभाष गादीया तर महासचिव पदाची जबाबदारी शैलेंद्र उर्फ बंटी कागलीवाल, सुधीर रांदड यांना सोपविण्यात आली.सेवा संघाच्या सचिव पदी सीए मनोज चांडक यांची तर सहसचिव पदी दीपक म. शर्मा,एड.अॅड.दुष्यंंतसिंह चौहान,महेश अरोरा यांना नियुक्त करण्यात आले.कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी कमल किशोर वर्मा तर अंकेक्षक म्हणून राजीव बजाज कामकाज बघणार आहेत.यावेळी संघटनेच्या युवा प्रकोष्टची ही घोषणा करण्यात आली.याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एड. हेमसिह मोतीसिह मोहता यांच्यावर तर महासचिव पदाची जबाबदारी प्रा अनुप गोवर्धन शर्मा यांना सोपविण्यात आली. सेवा संघाच्या कार्यकारिणीत एड.सुरेश अग्रवाल गुरुजी, निरंजन अग्रवाल,महेंद्र खेतान,संतोष अग्रवाल,विजय राठी, सुरेश बागरेचा,प्रमोद संघवी,शैलेंद्र पारख,संतोष छाजेड, राजेश लोढा,देवेंद्र तिवारी,राजेंद्र तिवारी,अरुण मोटलिया,पंकज शिवाल,संदीप जोशी, राजेश डोल्या, रवींद्र डंगायच,महेश खंडेलवाल,हरीश खंडेलवाल, कल्पेश खंडेलवाल,अमित खंडेलवाल, अरुण खत्री, गोविंद खत्री,राजेश खत्री,रवी वर्मा,संजय वर्मा, शामसुंदर वर्मा, कैलास वर्मा,रोहित वर्मा,दीपक साकला,नंदलाल सिसोदिया,दयाराम शर्मा,मंगेश जांगीड, धनराज अजाडीवाल, रवी सोनारिवाल,नरेश राणीवाल,कुंजीलाल सोनारीवाल,एड सुभाषसिह ठाकूर,संजय सिसोदिया,चेतनसिंग ठाकूर,विशालसिंग बिसेन,रमेश राजुरिया, बजरंग चौधरी, संजय चौधरी, मदन भरगड, जगदीश प्रजापत, अजय सेंगर, एड. पप्पू मोरवाल आदींचा समावेश करण्यात आला.सभेचे प्रास्ताविक निकेश गुप्ता यांनी,संचालन विजय तिवारी यांनी तर आभार शैलेंद्र कागलीवाल यांनी मानले. राष्ट्रगीताने या सभेची सांगता करण्यात आली. यावेळी डॉ.के के अग्रवाल,निरंजन अग्रवाल, गुरुचरणसिंग ठाकूर,रतनलाल वर्मा, रविशंकर वर्मा, पवनसिंग ठाकूर,भरत मिश्रा,संदेश रांदड,अमित खंडेलवाल, ग्यारशिलाल शर्मा,नवलकिशोर अग्रवाल समवेत राजस्थानी समाजातील सर्व घटकांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news