अकोट प्रतिनिधी
अकोला जिल्हा व जिल्ह्यातील सातही तालुक्यातील कार्यकारीण्या दि.२६ ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आल्या. वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने यांच्या आदेशान्वये व प्रदेशध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शक कार्यकारण्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये अकोट तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.तालुकाध्यक्ष पदी चरण इंगळे,तर महासचिवपदी रोशन फुंडकर,संघटकपदी सुरेंद्र औंईबे, कोषाध्यक्षपदी निलेश झाडे,तर प्रसिद्धी प्रमुखपदी स्वप्निल सरकटे यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे तालुक्यात आनंद मय वातावरण झाले आहे. नवनियुक्त झालेले पदाधिकारी एका दमाचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.असुन त्यांच्या निवडीचा जल्लोष वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटुन वाटुन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते दिवाकरजी गवई,मा.तालुकाध्यक्ष संदिप आग्रे, शत्रुघ्न नितोने, हरिहर पळसकर, ऍड भूषण घनबादूर, दिनेश सरकटे, सुनील घनबादूर,सुगत वानखडे, प्रफुल धांडे, दिनेश धांडे, आशिष रायभोले, सुनिल वाकोडे, सुनिल इंगळे, सतिश घनबादूर, संदिप सिरसाठ,सुरेश घनबादूर, पांडुरंग तायडे यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Super Sales and Services तर्फे सर्व नागरिकांना श्रीगणेश चतुर्थी आणि हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा
Super Sales and Services सर्व प्रकारच्या Home Appliances दुरुस्ती करीता संपर्क L S Supekar
मो. नं 9922009050