महानगरात श्री गणरायाची भक्तिभावात झाली स्थापना ! दोन वर्षानंतर श्री मूर्तीची उंची बारा फुटा पेक्षा जास्त

अकोला कोविड कालावधीनंतर यावर्षी अकोला महानगरात श्री गणरायाचे मोठ्या थाटात व कोणतेही निर्बंध लक्षात न घेता आगमन झाले.यंदा महानगरातील मोठमोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बारा फुटापेक्षा जास्त गणरायाची मूर्ती निर्माण केली आहे.श्री गणरायाच्या आगमनाने बाजारपेठ फुलून गेली असून श्री साहित्याची विविध ठिकाणी विक्री जोमाने होत आल्याचे दिसून आले आहे. महानगरातील सिंधी कॅम्प ,अशोक वाटिका, जुने शहर ,जठारपेठ, जवाहर नगर चौक, टॉवर चौक,अकोला क्रिकेट मैदान ,कारमेल शाळेच्या परिसरात गणपती विक्रीची दुकाने मोठ्या संख्येने थाटली आहेत. या दुकानातून विविध प्रकारच्या श्रीमूर्ती भाविक घेऊन जात आहेत. यंदा पेन व अलिबागच्या मुर्त्यानेही शहरात आगमन केले आहे. जुन्या शहरातील अनेक दुकानात पेन पनवेलच्या मुर्त्या विक्री केल्या जात आहेत. गणरायाच्या आगमनानंतर शहरातील मातब्बर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन केले आहे. सर्वात जास्त भर रक्तदानावर यावर्षी देण्यात आला आहे. अनेक मंडळांनी मोठ-मोठे रक्तदान सोहळे आयोजित केले आहेत. त्याचप्रमाणे सामूहिक अन्नदानाचा कार्यक्रम ही विविध गणपती मंडळांनी आयोजित केला आहे. शासनाचे गणपती देखावे उपक्रमाच्या संदर्भात निर्बंध नसल्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हेच वातावरण आगामी नवदुर्गा व गरबा उत्सवात ही पहावयास मिळणार असल्याची चर्चा श्री भक्तात करण्यात येत आहे.
Super Sales and Services
तर्फे सर्व नागरिकांना श्रीगणेश चतुर्थी आणि हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा
Super Sales and Services सर्व प्रकारच्या Home Appliances दुरुस्ती करीता संपर्क L S Supekar
मो. नं 9922009050