२ सप्टेंबर २०२२ रोजी शेगाव जि. बुलढाणा येथे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा मेळावा.

अकोला –• बिल्डींग पेंटर बांधकाम व इतर असंघटीत मजूर सघ महाराष्ट्र शाखा ता. शेगाव जि. च्या वतीने शुक्रवार २ सप्टेंबर २०२२ रोजी शेगाव येथे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा मेळावा स्थानिक भास्कर सभागृह शेगाव, खामगाव रोड, येथे सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. मेळाव्याचे उद्घाटक उप कार्यकारी अधिकारी तथा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ जि. बुलढाणा आनंद राठोड हे राहणार असून मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शेगाव ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर कान्हेरकर राहणार आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मेश्राम राहणार आहेत.
मार्गदर्शक सागर तायडे स्वतंत्र मजदूर युनिअन, महाराष्ट्र अध्यक्ष हे असून प्रमुख उपस्थिती गट विकास अधिकारी, शेगाव सतीश देशमुख, गवंडी बांधकाम मजूर संघटनेचे अध्यक्ष भीमराव बागुल, मुंबई हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे उपाध्यक्ष अब्दुल बशीर महासचिव विनोद जपसरे, सचिव मनोज बाविस्कर, कोषाध्यक्ष आत्माराम साठे, केंद्रीय सदस्य अब्दुल जमीर, केंद्रीय सदस्य गौतम उबाळे, युवराज खडसे, सुरेश कारंडे संघटक, गणेश सावळे प्र. प्रमुख, महेंद्र कांबळे लातूर,सुजय जाधव पालघर, शेख युनुस वाशीम, माधव कांबळे नांदेड, प्रियाताई झांबरे चंद्रपूर, अ.भा.ग्रा. पत्रकार संघ खामगाव अध्यक्ष गणेश पानझडे, बुलढाणा जि अध्यक्ष नितीन वाकोडे, सचिव मो. नसीम, उपाध्यक्ष गणेश मोरे, व बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यातील मो. इक्बाल, मंजूर खान, रशीद खान, शेख राजिक, यांचे सह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ता. पदाधिकारी व जि. पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. समाजातील प्रत्येक कष्टकरी कामगारापर्यंत जाऊन त्यांना शासकीय योजनांची माहिती व्हावी म्हणून संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या वतीने जनजागरण अभियान राबवीत आहो. श्रमिक हिताय श्रमिक सुखाय हे एकमेव उद्दिष्ट ठेऊन कामगार चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात सभासद जोडून व जनजागरण अभियान राबवीत येणार आहे. याची माहिती देण्याकरिता कामगार चळवळीत काम करणारे कामगार नेते या मेळाव्यात कामगारांच्या निराकरण कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांना याची माहिती व्हावी व सुसंवाद व्हावा याकरिता जनजागरण मेळाव्यात जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन गणेश सावळे, प्रसिद्धी प्रमुख यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
Super Sales and Services
तर्फे सर्व नागरिकांना श्रीगणेश चतुर्थी आणि हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा
Super Sales and Services सर्व प्रकारच्या Home Appliances दुरुस्ती करीता संपर्क L S Supekar
मो. नं 9922009050