आईच्या चेहऱ्यावर पोटच्या मुलीने फेकले फेविक्विक द्रव्य!

मुलीचे आणी आईचे अतूट नाते आवण नेहमीच पाहत आलो आहे नकोशी असलेल्या मुलीमुळे आई आणी मुलीला काढून दिल्याच्या घटना पण आपण पाहत आलोय पण आता याचं मुली मुली आईच्या जीवावर उठली असल्याची घटना अकोला शहरातील अति वर्दलीच्या ठिकाणी घडली असून स्वतःच्या सख्या मुलीने जन्मदात्या आईवर फेविक्विक पदार्थ फेकून तिला जखमी करण्याचा प्रयत्न केला.

अकोला अकोला शहरातील गंगा नगर येथील अनिता चतुर्भुज अहिरवार या महिलेच्या चेहऱ्यावर पोटाच्या मुलीने आईच्या चेहऱ्यावर सारखे फेविक्विक द्रव्य टाकल्याची घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली आहे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ असलेल्या जैन चौकाकडे जाणाऱ्या मोठा पुलाजवळ जवळ घडली आहे. मुलगी आणि आईचे आपसी वाद असल्याचे बोलले जात आहे.

अल्पवयी मुलगी असून सदर मुलीने आईच्या चेहऱ्यावर फेविक्विक द्रव्य टाकून ही मुलगी फरार झाली. सदर घटनेवेळी नागरिकांनी मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला असता मुलींनी नागरिकांना चकमा देत पळ काढला या घटनेची माहिती मुलीच्या आईने सिटी कोतवाली पोलिसात दिला असून आपल्या आपल्या पोटच्या मुलीने आपल्यावर फेविक्विक सारखा पदार्थ टाकून आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील केला आहे . सिटी कोतवाली पोलिसांनी सदर महिलेला सामान्य रुग्णालयात उपचार दाखल केले असून पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news