आज गुढीपाडवापासून श्री राज राजेश्वर मंदिर सह महानगरातील प्रभागांमध्ये कार्यरत झाले रुद्राक्ष वितरण केंद्र
श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीचा उपक्रम
अकोला — हिंदू धर्मियांचे प्रमुख श्रद्धास्थान आणि आदर्श पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव निमित्ताने हिंदू नववर्ष प्रारंभ दिन अर्थात आज गुढीपाडवा सकाळपासून अकोटफाईल, देशमुखफाईल ,शिवसेना वसाहत, शिवाजी नगर,,श्री राज राजेश्वर मंदिर परिसर, अक्कलकोट ,राम मंदिर परिसरात रुद्राक्ष वितरीत केंद्रांवरून रुद्राक्ष वितरित करून जन्मोत्सव सुरू करण्यात आला आहे.

श्रीराम जन्मोत्सव सेवा समिती च्या वतीने पहिल्यांदाच 2लाख 11 हजार रुद्राक्ष काशी येथून आणून विधिवत पूजन करून महानगरात आणले आहेत श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने 2 लाख 11 हजार पवित्र रुद्राक्ष वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले असून आजपासून रुद्राक्ष वितरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत..
आज सकाळी श्री राज राजेश्वर मंदिर परिसरात राजेश मिश्रा, देवा गावंडे कार्तिक झापर्डे,मुन्ना उकर्डे, विजय नितळे, रुपेश ढोरे,गणेश बुंदेले, अमित भिरड, मनीष ढोंबरे, अतुल साहू,तुषार पांडे, गोपाल नवाडे, मोहित बुंदेले आणि मित्र मंडळ यांनी तर अकोटफाईल भागात शरद तुरकर,प्रकाश वानखडे आणि मित्र मंडळ, शिवाजी नगर भागात मंजूषा शेळके,नितीन ताकवालेआणि मित्र मंडळ, शिवसेना वसाहत मध्ये गाजनन चव्हाण, अजय भटकर,आशु तिवारी आणि मित्र मंडळ, अक्कलकोट येथे चेतन मारवाल, राजेश इंगळे, राम मंदिर परिसरात संजय अग्रवाल सागर कुकडे आणि मित्र मंडळ यांनी रुद्राक्ष वितरण केंद्रावर सकाळपासून रुद्राक्ष वितरण करण्यात आले हाकार्यक्रम येत्या 26 मार्च पर्यंत महानगरातील सर्व प्रभागांमध्ये वितरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे महानगरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने राजेश मिश्रा,गजानन चव्हाण, शरद तुरकर, प्रकाश वानखडे,मंजुषा शेळके ,नितीन ताकवाले ,योगेश गीते,आदींनी केले आहे.
सोबतच श्रीराम नवमी च्या दिवशी सकाळी 9 वाजता अकोल्याचे प्रमुख श्रद्धास्थान श्री राज राजेश्वर मंदिर येथून मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे त्यामुळे महानगरातील आपल्या प्रभाग निहाय रुद्राक्ष वितरण केंद्रावरून रुद्राक्ष घेऊन जावे आणि रामनवमी दिवशी आयोजित मोटारसायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे