कोठारी वाटिका नंबर पाच मध्ये अज्ञान युवकांनी जाळल्या दुचाकी गाड्या!

अकोल्या शहरात केल्या दोन महिन्यापासून दुचाकी जाळण्याच्या घटना घडत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोठारी वाटिका नंबर पाच मधील येणाऱ्या लंबोदर रेसिडेन्सी मध्ये अज्ञात युवकांनी तीन मोटरसायकल जाळण्याची घटना 21 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन गाड्यांपैकी दोन गाड्या या पूर्णपणे जळून खाक झाले तर तिसरी गाडी थोड्या प्रमाणात जुळली असून या तीन गाड्यांपैकी एक गाडी पोलीस कर्मचाऱ्यांची असल्याचे बोलले जात आहे.ह्या तीन गाड्या जाळण्यामागे उपदेश काय होता. ह्या तीन गाड्या कोणी जाळल्या याचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी आवश्यक झाले आहे. कोठारी वाटी का पाच मधील नागरिकांनी या परिसरात पोलीस ग्रस्त वाढवण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. पुढील तपास खदान पोलीस स्टेशन करीत आहे.