मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या सभेत स्क्रिनवर माहीमची एक जागा दाखवली. या व्हिडीओत माहीममध्ये भर समुद्रात दर्गा बांधला जात असल्याचं त्यांनी निदर्शनास आणनू दिलं. तसेच समुद्रातील हे संबंधित अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर आम्ही त्याच्या बाजूला गणपतीचं मोठं मंदिर उभारु, असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना संबंधित बांधकाम हटवावं नाहीतर आपण आपल्या पद्धतीने हटवू, असा इशाराच दिला.

राज ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा – 
माहिमच्या समुद्रामध्ये दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असं आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिलं आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news