सुमधुर स्वरांनी सजली पाडवा पहाट स्वर साधना व किड्स पॅराडाईजचा उपक्रम

पातूर : मराठी नववर्षाची पहाट सुरेल भक्तीगीत आणि भावगीतांच्या सुरेल स्वरानी सजली. स्वरसाधनाच्या चिमुकल्या बाल कलावंतांच्या एकाहून एक सादरीकरणाने पातुरची पाडवा पहाट अधिक रंगली. किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या मराठमोळ्या नृत्याने नावं वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.

गुडीपाडवा आणि संत सिदाजी महाराज यात्रा सप्ताह निमित्त पडावा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर साधना सांगित विद्यालय, किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल व सिदाजी महाराज संस्थानच्या वतीने हा उपक्रम पार पडला.


यावेळी स्वरसाधना सांगित विद्यालयाचे संचालक प्रा. विलास राऊत, संदीप देऊळगावकर, किड्स पॅराडाईज चे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,पत्रकार देवानंद गहिले, प्रा. विठोबा गवई आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम स्वर साधना सांगित विद्यालयाचे चैताली वडतकार, यशश्री गहिले, श्रेया निलखन, समृद्धी खोकले, आरुषी खोकले, सेजल राऊत, गौरी इंगळे, विना राठोड, भक्ती निंबोकार, गौरव वडकुटे, संजीवनी गाडगे, शीतल वडतकार, खुशी उगले, रुपाली भिंगे आकाश गाडगे, संदीप देऊळगावकर यांनी भावगीते, भक्तीगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मंगेश राऊत, प्रविण राऊत, अंश अत्तरकार, राघव गाडगे यांनी साथसंगत दिली.


त्यानंतर किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या शर्वरी दळवे, तेजस्विनी ढोणे, शरयू बगाडे, निधी चव्हाण, गार्गी ढोकणे,अनुश्री मुसळे, भार्गवी गणेशे, गणश्री राठोड, समृद्धी फुलारी,सोनम मेहरे आदी कलावंतांनी मराठमोळी संस्कृती चे दर्शन आपल्या लोक नृत्यातून घडवले. यावेळी नृत्य दिदग्दर्शन वंदना पोहरे, पल्लवी पाठक, नितु ढोणे यांनी केले. कार्यक्रमासाठी बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, संतोष लसनकर, अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले. संचालन संदीप देऊळगावकर यांनी केले तर गोपाल गाडगे यांनी आभार मानले.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news