अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जेल भरो आंदोलन!
कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहेय…2019 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी ‘ सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसं ? ‘ अस वक्तव्य केलं होतं…मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आहेय… मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल राहुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता…त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जेल भरो आंदोलन केलंय… नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्या आली यावेळी सुमारे 70 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं…
