भारतीय कामगार सेना युनिट तर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ


अकोला :- इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झाली. पण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. ज्यांना तुम्ही गुरूस्थानी मानून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा ही दिलेल्या असतात. म्हणूनच मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद तर साजरा करतो. पण या दिवशी दु:खही तेवढेच होत असते. तुमच्या जवळपासची व्यक्ती सेवानिवृत्त होणार असेल तर तुमच्या मनातील त्यांच्याविषयीच्या भावना व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष योगेश मारवाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निरोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्ष जितेन्द्र तिवारी,तसेच विधी विभाग प्रमुख श्याम ठाकुर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुर्यकांत बनसोड,सुनिल धांडे,राजेश जुनगडे,दिपक दामोदर,हरिदास इंगळे,सुनंदा जवंजाळ माया नागदिवे,शेख.अयुब, धम्मपाल तायडे,प्रकाश कटके,,याचा सत्कार करुन निरोप व भावी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या समारंभासाच्या यशस्वीकरीता सुनील इंगळे सरचिटणीस, गणेश गावंडे, खजिनदार, संजय खराटे, महेश राऊत,सचिन सावजी,शेख.सरफराज, दिपक दाणे, लिमये,कैलास ठाकुर,सतिष वखारीया, संजय सुर्यवंशी, रामक्रुष्ण पोहरे,अनिल वानखडे,गजानन रामटेके,जितेन्द्र रणपिसे,संतोष पांडे,देवानंद तायडे,संगिता ठाकुर, वर्षा गावंडे,नंदा राऊत,कविता सगळे,माया ठाकुर व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.