“गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व अचूक मार्गदर्शन मिळावे हाच प्रामाणिक हेतू” – डॉ.रणजीत पाटील

“गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व अचूक मार्गदर्शन मिळावे हाच प्रामाणिक हेतू” – डॉ.रणजीत पाटील

‘एनईईटी’ ही वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची परिक्षा यामधून केवळ एम.बी.बी.एसच नाही तर बी.डी.एस , बी.ए.एम.एस., फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, फार्मसी यासारखे अनेक वैद्यकीय प्रवेश सुद्धा घेता येतात त्या परिक्षेच्या निकालानंतर महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे प्रवेश प्रक्रिया की, जी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय संचालनालय मुंबई येथून पार पाडली जाते. प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाण्यापूर्वी ती, विद्यार्थी व पालकांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याकरिताच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व अचूक मार्गदर्शन मिळावे हाच या कार्यशाळेच्या आयोजनाचा प्रामाणिक हेतू आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले ते रविवारी प्रभात किड्स स्कूल अकोला येथे आयोजित वैद्यकीय प्रवेश पुर्व मार्गदर्शन कार्यशाळेत उद्घाटक म्हणून बोलत होते.
सदर कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वैद्यकीय प्रवेशाचा इतिहास उलगडताना एनईईटी परिक्षा संदर्भात स्पष्टीकरण दिले. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर ही परिक्षा घेण्यात येते. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाकरीता राष्ट्रीय पातळीवर १५ टक्के तर राज्यासाठी ८५ टक्के जागा असतात, असे शिनगारे यांनी सांगितले. सदर परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जागरुकपणे फॉर्म भरावा. अत्यंत पारदर्शक पध्दतीने प्रवेश प्रक्रीया राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांनी फॉर्म काळजीपूर्वक भरावा. छोटीशी चूकसुध्दा प्रवेशापासून वंचित ठेवू शकते. महाविद्यालयाची निवड करीत असताना त्या महाविद्यालयाचा कोड व्यवस्थित भरा. आरक्षण, किती जागा आहेत, शुल्क किती याची माहिती घ्या. फॉर्म व्यवस्थित वाचून तो भरल्यानंतर इतरांना दाखवा, त्यातील चुकांची दुरुस्ती करुनच फॉर्म सबमिट करावा, असेही डॉ.शिनगारे यांनी सांगितले. यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गजानन नारे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास डॉ. अपर्णा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजबीये, डॉ. अशोक ओळंबे, संजय चौधरी, डॉ नरेश बजाज,प्रा.नितीन ओक, विनोद काळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश चतरकर यांनी केले तर आभार रविकुमार खेतकर यांनी मानले सुत्रसंचलन संजिवनी अठराळे यांनी केले कार्यक्रमाला अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील, विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सचिन काठोळे, मनिष गावंडे, बाळकृष्ण गावंडे,विजय वाकोडे, साबीर कमाल, देवेंद्र वाकचवरे, सचिन पाटील,सिध्देश मुरारका यांनी परिश्रम घेतले.

3 thoughts on ““गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व अचूक मार्गदर्शन मिळावे हाच प्रामाणिक हेतू” – डॉ.रणजीत पाटील

 1. First of all I would like to say wonderful blog! I had a
  quick question in which I’d like to ask if you do not mind.
  I was curious to find out how you center yourself and
  clear your head before writing. I’ve had difficulty clearing my
  thoughts in getting my thoughts out there. I do enjoy writing but it just seems like the first 10 to 15 minutes
  are lost simply just trying to figure out how to begin. Any ideas or
  tips? Cheers!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news