श्री गणेश कला महाविद्यालयाला नॅक चे ‘ बी ‘ मानांकन प्राप्त
बोरगाव मंजू
हनुमान ग्राम विकास प्रतिष्ठान द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयाला नुकतेच नॅक, बंगलोर चे बी मानांकन प्राप्त झाले आहे. नॅक ने पाठवलेल्या चमूने महाविद्यालयाचे संपूर्ण परीक्षण करून महाविद्यालयाच्या दर्जाबाबत अहवाल सादर केला व महाविद्यालयाला बी मानांकन प्रदान करण्यात आले. महाविद्यालयाचा शैक्षणिक तसेच इतरही बाबतीतला दर्जा सुधारण्यासाठी गरज नॅक च्या चमूने प्रसंगी महाविद्यालयीन कर्मचारी, प्राध्यापक वृंद तसेच संस्था संचालक मंडळ यांना मार्गदर्शन करून पुढील नॅक च्या वेळी दर्जा सुधारण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन केले. नॅक तपासणी गेल्या अनेक महिन्यांपासून महाविद्यालयीन सर्व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी महाविद्यालयाला नॅक चा उत्तम दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत होते,महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी तसेच पालक वर्गांचेही याप्रसंगी महाविद्यालयाच्या तपासणी कार्यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले, तसेच नॅक तपासणी साठी संस्थापक प्रा. तुकाराम बिडकर , संचालक प्रकाश बिडकर सह प्राचार्य डॉ. के. व्ही. मेहरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच IQAC समन्वयक प्रा. मेघराज गाडगे,सह प्राध्यापक आदींनी सहकार्य केले.