अकोला शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विजय देशमुख यांची शरद पवार गटाकडून बंडतर्फ कारवाई!
अकोला शहराचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय देशमुख यांची शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे बंडतर्फे ची कारवाई करण्यात आली असून अजित पवार यांनी शरद पवार यांना राम राम ठोकून अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार गटातील बरेच दिग्गज नेते हे अजित पवार गटात सामील झाले त्यात अकोला शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे विजय देशमुख हे सुद्धा अजित पवार यांच्या गटात सामील झाले असून. अजित पवार गटातर्फे विजय देशमुख यांनामोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले असून विजय देशमुख हे अजित पवार यांचे अत्यंत निगटीय असल्यामुळे विजय देशमुख यांना पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी विजय देशमुख यांना दिली जाणार असल्याचे अजित पवार गटातर्फे बोलले जात आहे.