मनपा आयुक्तांनी घेतली झाडाझडती बरेच कर्मचारी अनुपस्थित!
मनपा आयुक्त घेणार आठवड्यातून एकदा कार्यालयाची झाडझडती!
अकोला:- आज दि.5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी स्वताहुन लेटलतीफ कर्मच्यां-र्याची झाडाझडती घेतल्याने मनपा कर्मचारी वर्गात धडकी भरली. विशेष म्हणजे जे कर्मचारी वेळेवर न आल्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून बाहेरी कर्मचारी आत मध्ये येऊ याची आयुक्तांनी खबरदारी घेतली या अगोदर सुद्धा आयुक्तांनी प्रत्येक कार्यालयाची झाडझडती घेतली त्यावेळी सुद्धा मनपातील कर्मचारी तसेच विभाग प्रमुख अनुपस्थित होते. या अगोदर सत्य लढाने लेटलतीफ कर्मच्यां-र्याचे स्टिंग ऑपरेशन केले होते हे विषेश तरीपण मनपा कर्मचारी सुधरायचे नाव नाही घेत हे आजच्या तपासणी वरुन लक्षात आले. आयुक्त यांनी सर्व विभाग प्रमुख तसेच त्यांच्या अख्तररित्या येत असलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या दालनात उपस्थित राहण्याच्या सुचना केल्यानंतर विभाग प्रमुखांची चांगलीच खरडपट्टी काढली यानंतर मी कधीही कार्यालय तपासणार असुन कर्मचारी गैरहजर राहिल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल अशी सक्त ताकीद दिली असल्याने तसेच हलचल रजिस्टर वर नोंद करण्याच्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हलचल रजिस्टर हे मनपा कार्यालयात नावापुरतेच ठेवले गेले आहे. आजच्या झाडझडतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी खोटी कारणे देत असल्याचे कळते आम्ही साइटवर होतो! तर कोणी आमच्याकडे दोन दोन टेबल असून आम्ही कामानिमित्त बाहेर गेलो होतो असे आयुक्तांना सांगितले. मात्र कर्मचारी हे आयुक्तांपेक्षा मोठ्या पदावर असल्यामुळे ते केव्हाही येऊ शकतात जाऊ शकतात अशी परिस्थिती मनपात झाली आहेका?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हम नही सुधरेंगे प्रमाणे मनपा कर्मचारी मुख्यालय येथे उपस्थित राहत नसल्याने अनेक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी झाडाझडती घेतल्याचे समजते. आता येणा-र्या काळात कर्मचारी आजचे प्रकरण किती गांभीर्याने घेतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.