अकोला पंचायत समितीमध्ये आणखी एक ग्रामसेवक निलंबित!
राजकीय दबावाला अंगलट!
अकोला जिल्ह्यामध्ये अकोला सर्वात मोठी पंचायत समिती आहे या पंचायत समिती अंतर्गत 97 ग्रामपंचायती आहेत या पंचायत समिती सध्या च्या परिस्थितीतमध्ये 60गामसेवकाची पदे मंजूर असून त्यापैकी कार्यरत 51ग्रामसेवक आहेत अशा परिस्थितीत आणखी एक ग्रामसेवक निलंबित होऊन त्या बाकीच्या ग्रामसेवकांवर आणखी कामाचा बोजा वाढणार आहे अशातच आणखी एक ग्रामसेवक एस .एस. देमापुरे हे मागील ऐक वर्षापासून अकोला पंचायत समितीला ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत सदरचे पद गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचेआहे ग्रामपंचायतचे कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने व गावातील विकास कामे करून घेणे हे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु असे असताना सुद्धा एस .एस .देमापुरे यांनी प्रभार न घेणे नाकारणे वारंवार ग्रामपंचायत बदली करण्याची मागणी करणे, वरिष्ठांच्याआदेशाप्रमाणे प्रभार हस्तांतराची कार्यवाही वेळेवर न करणे सोपविलेल्या ग्रामपंचायत मध्ये काळजीपुर्वक कामकाज न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द वारंवार तक्रारी पंचायत समितीलाप्राप्त झाल्या होत्या, राजकीय दबाव आणण्याचा प्रत्यक्त करणे इ. बाबी प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणा-या असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिनांक 30/ 6/2023 रोजी कु.सुनिता देमापुरे,आमसेवक, पंचायत समिती अकोला यांनी वर्तणूकीचा भंग केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच …आदेश क्रमांक 1776नुसार सेवेतून तात्काळ निलंबित केलेले आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचे निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद महाराष्ट्र जिल्हा परिषद व सेवा वर्तणूक नियम 1967 चे कलम तीन चा भंग केल्यामुळे आदेश निर्गमित केलेले आहे .सदर निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती मुर्तीजापुर हे राहील तसेच त्यांना सक्त सूचना दिले आहे . निलंबनाच्या कालावधीत त्यांना खाजगी नोकरी किंवा उद्योग धंदा करता येणार नाही या आदेशात नमूद केले आहे.