प्रतिबंधित गुटखा जप्त सिटी कोतवाली पोलीस स्टेशन कारवाई!
अकोला दि 05/जुलै रोजी जुना भाजी बाजार, अकोला येथे काही इसम हे प्रतिबंधित गुटखा व तंबाखू याची विक्री करीत आहे अशा मिळालेल्या गुप्त बातमी वरून पो. स्टे. सिटी कोतवाली हद्दीतील जुना भाजी बाजार, अकोला येथे 02 ठिकाणी छापा कार्यवाही केली असता आरोपी नामे 1) साबीर खान ताहेर खान वय 40 वर्षे रा बैदपुरा अकोला व त्याचा मालक चंदू अग्रवाल यांचे कडून 30,420 रु चा प्रतिबंधीत गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला आहे तसेच 3) कमल मनोहर दुलानी, वय 35 वर्षे रा सिंधी कॅम्प अकोला याचे कडून 19,200 रु चा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे 02 केसेस करण्यात आले असून एकूण 49,620 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधागावकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनी विना भगत भालतीलक, पोउपनी माजिद पठाण, पोहवा महेंद्र बहादूरकर, पोहवा प्रकाश मांडवगने, पोहवा संजय येलोणे, नापोका ख्वाजा शेख व पोका निलेश बुंदे यांनी केली आहे.