वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांची शहिद कुटुंबाला सांत्वन भेट.
तुंलगा बु येथील सैनिक सैनिक सुरेश मोतीराम महल्ले यांना कर्तव्यावर असतांना आले होते वीर मरण.
✒️ निखिल इंगळे सह किरण निमकंडे
पातूर तालुक्यातील तुंलगा बु येथील ( ११९ इंजिनिअर रेजिमेंट) झासी येथे सैन्य दलात कार्यरत असलेले सैनिक सुरेश मोतीराम महल्ले वय ४० कर्तव्यावर असतांना हृदय विकाराने झटका आल्याने मृत्यू झाला होता.
तुंलगा बु येथील शेतकरी कुटूंबामधील असलेले सुरेश मोतीराम महल्ले हे वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजे २००३ साला मध्ये देशसेवेत रुजू झाले होते. वीस वर्ष सेवा देऊन झाले असून त्यांच्या मागे आई व पत्नी, एक मुलगा १० वर्ष,तर दुसरा मुलगा ८ वर्षाचा असून परिवार सुद्धा त्यांच्या सोबत होता. त्यांच्या वर दिनांक ३० जून रोजी राहत्या घरी तुंलगा बु येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
या कुटूंबाची वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा एड प्रकाश आंबेडकर यांनी सांत्वन भेट घेतली आणि कुटुंबाच्या सदस्या ची। आस्थेने विचार पूस केली यावेळी त्यांच्या समवेत प्रमोद देंडवे जि अध्यक्ष मिलिंद इंगळे जि महासचिव सुनील फाटकर जि, प उपाध्यक्ष कश्यप जगताप,ओमप्रकाश धर्माळ ता,अध्यक्ष शरद सुरवाडे महासचिव राजू बोरकर संघटक चंद्रकांत तायडे ता,अध्यक्ष युवा आघाडी, विनय दाभाडे,मंगल तेलगोटे, संदेश दाभाडे आशिष दाभाडे सुमेध हतोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
✒️ निखिल इंगळे सह किरण निमकंडे