गायरान जमिनीला कायदा पट्टे मिळून देण्याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने विधानभवनावर धडक मोर्चा

चरण इंगळे यांचे गायरान धारकांनी नाव नोंदणी करण्यासाठी आवाहन.. ![]() |
अकोट प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ज्या लोकांनी गायरान जमिनी संपादित केलेल्या आहेत परंतु अद्यापही त्या लोकांना अजून पर्यंत वाहिवाटीस असलेल्या जमिनीचे पट्टे मिळालेले नाहीत.त्या सर्व जमीन धारकांनी नाव ,गट नंबर, गावाचे नावासहित व संपादित केलेले क्षेत्र यांची माहिती तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्याशी संपर्क साधावा व नोंद करून द्यावी आणि या संदर्भात दिनांक 20जुलै 2023 रोजी मुंबई येथे विधान भवनावर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात मोर्चाचे आयोजन केले आहे. तरी सर्व गायरान जमीन धारकांनी मोर्चामध्ये सामील होण्याकरिता अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्याशी संपर्क 9766106318 साधून आपले नाव नोंदणी करावे.