जुलै महिन्याचा आठवडा संपत आहे. मात्र अद्यापही अकोल्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सद्य:स्थितीत अकोल्यातील वान धरणात केवळ ३३ टक्के साठा शिल्लक आहे. अशातच खरीप हंगामास यावर्षी मुकणार की काय, अशा परिस्थितीमध्ये पाऊस न पडल्यास रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. जुलै महिन्याचे आठ दिवस उलटले तरी दमदार पाऊस नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने दांडी मारली असून, अकोला जिल्ह्यासह तेल्हारा तालुक्यामध्ये चिंतेचा विषय बनले आहे. दररोज ढगाळ वातावरण असते . मात्र पाऊस नाही. गेल्यावर्षी यावेळी सर्व पेरण्या आटोपल्या होत्या. आता पेरणी केल्यानंतर पावसाने अशाच प्रकारची हुलकावणी दिली तर शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहणार आहे.