जागेचा योग्य मोबदला दया,अन्यथा 15 ऑगस्टला दंड बैठक आंदोलन,रेल्वे उड्डाण पूल विस्थापित संघर्ष कृती समितीचे जिल्हाधकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात राष्ट्रीय महामार्ग , राज्यमार्ग, मेट्रो , उड्डाणपूल , धरणे , शासकीय इमारती करिता नियमाने आवश्यक भूसंपादन हे भूमिसंपादन व पुनर्वसन व पुनरवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियमानुसार अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून होत आहे.
मात्र मूर्तिजापूर येथील भू – संपादन अधिकारी तथा उप – विभागीय अधिकारी यांनी रेल्वे उड्डाण पूल परिसरातील रहिवाश्यांना उप – विभागीय अभियंता सा.बा. उपविभाग मूर्तिजापूर यांचे मार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत या नोटीस मध्ये मूर्तिजापूर रेल्वे उड्डाण पूला करिता आवश्यक भूमिसंपादन करताना उचित भरपाई मिळण्याची पारदर्शक प्रक्रिया काय असेल ? याबाबत कोणतीही सविस्तर मार्गदर्शक सूचना नोटीस सोबत रहिवाश्यांना पुरविण्यात आली नाही किंवा भू – संपादन अधिकारी तथा उप – विभागीय अधिकारी मूर्तिजापूर आणि उप – विभागीय अभियंता सा.बा. उपविभाग मूर्तिजापूर यांचे कार्यालयात उपलब्ध नसून शासकीय कामासाठी खाजगी वाटाघाटी द्वारे भूसंपादन करण्याचे नोटीस मध्ये नमूद केलेले आहे.
हा प्रकार संशयास्पद असून अन्यायझालेल्या रहिवाशी नागरिकांना सुधारित नोटीस बजावण्या बाबत भू – संपादन अधिकारी तथा उप – विभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना आदेशित करावे . व आम्हांला योग्य मोबदला देण्यात यावा असे निवेदन येथील अन्याय होत असलेल्या समस्त नागरिक व रेल्वे उड्डाण पूल विस्थापित संघर्ष कृती समिती , ता.मूर्तिजापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तसेच योग्य मोबदला न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर दंड बैठक आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही शासनाला या निवेदनाद्वारे देण्यात आला.