चार कोटी खर्चून बांधण्यात आले पूल पहिल्याच पावसात पाण्यात!
सामान्य जनतेच्या पैशाची लूट अकोट अकोला मार्ग बंद!
अकोला – अकोट ब्रॉडगेज वरील रेल्वे धावणार ताशी 20 ते 25 मिनिट वेगाने!
सामान्य नागरिकांचा वेळ व पैसा होणार खर्च!
जिह्यात पाऊस कमी पडला असला तरी नदीच्या पाण्याच्या पातळीत झाली वाढ मोठा पूर आल्यास गांधीग्राम येथील नव्याने बांधलेला पूल वाहून जाण्याच्या मार्गावर…
अकोला – अकोट जोडणारा मुख्य मार्ग असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल गेला पाण्याखाली!
चार कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलाचा गाजावाजा करून करण्यात आले होते उद्घाटन!
पहिल्यात पावसात पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प लोकप्रतिनिधींना सामान्य नागरिकांच्या पैशाची कशी उधळपट्टी करायची आहे. हे लोकप्रतिनिधींना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. अद्याप जसा पाहिजे तसा पाऊस झाला नसून काल आणि परवा थोड्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे गांधीग्राम येथील अर्धवट बांधण्यात आलेला पूल हा पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गांधीग्राम पुलासाठी सामान्य नागरिक तसेच विविध पक्षाने आंदोलन केले होते. त्यामुळे घाई गडबडीत लोकप्रतिनिधींनी गांधीग्राम नदीवर छोट्याशा पुलाची निर्मिती केली या पुलाकरिता तब्बल चार कोटी खर्च करण्यात आले. मात्र हे पैसे सामान्य नागरिकांचे असून आज हा पूल पाण्याखाली गेला असून उद्या मोठ्या प्रमाणात पूर जर आला तर हा पूल वाहून जाण्यास काही वेळ लागणार नाही. तसेच सामान्य नागरिकांचे पैसे हे पुलाच्या माध्यमातून वाहून जाणार आहेत.
हे मात्र तितकेच खरे .नागरिकांनी सतर्कता बाळगून या पुलावरून प्रवास न केलेलाच बरा अशी चर्चा आता रंगू लागली आहे. आता हा जर पूल वाहून गेल्यास सामान्य नागरिकांनी कोणत्या मार्गे जायचे असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तर दुसरीकडे प्राप्त माहिती अनुसार अकोला अकोट ब्रॉडगेज वर धावत असलेली रेल्वे गाडीची गती होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आत्याच्या स्थितीत ब्रोडगेजवर धावत असलेली गाडी साठ ते सत्तरच्या स्वीटनेही गाडी धावत होती. मात्र पावसाळा लागल्यामुळे सदर रेल्वे रुळावर मुरूम न टाकता काड्या मातीचा उपयोग केल्यामुळे अकोट अकोला रेल्वे गाडीशी आता ताशी 20 ते 25 च्या स्पीडने धावणार असल्याचे एका नाव न सांगता रेल्वे अधिकाऱ्याने ही माहिती सत्य लढायला दिली आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना पैसा तर मोजावा लागेलच मात्र वेळ सुद्धा मोजावी लागणार आहे.