मुख्याध्यापकांना संस्थाअध्यक्षांसह दोंघानी केली मारहाण गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडला किनखेड येथे लाजिरवाना प्रकार -तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
अकोट तालुक्यातील किनखेड पूर्णा येथील संत तुकाराम महाराज विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुख्याध्यापक शशिकांत खोटरे यांना संस्था अध्यक्ष, त्यांचा मुलगा व भाऊ यांनी जबर मारहाण केली. या घटनेनंतर खोटरे यांना मानसिक धक्का बसला असून त्यांच्या फिर्यादी वरून उपरोक्त तिन्ही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटने पासूनच तिघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. देशाची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करीत असल्याने त्यांना गुरू चा मान आहे . समाजात गुरू कडे मोठ्या आदराने बघितल्या जाते व त्यांचा मान मोठाच असतो.यामुळेच गुरुपौर्णिमेला अधिक महत्व आहे.
असे असताना किनखेड येथील संत तुकाराम महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक/प्राचार्य शशिकांत नामदेव खोटरे यांनी संस्थाध्यक्षांच्या मनमानीला विरोध केल्याने,नियमबाह्य कामे करण्यास नकार दिल्याने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना त्रास देण्यासाठी खोट्या नोटीसेस बजावण्याकरिता दबाव टाकने,शिक्षक व कर्मचारी अतिरिक्त ठरवून बाहेर पाठविण्यासाठी शाळेची पटसंख्या कमी करणे,खोटेनाटे आरोप करून कर्मचाऱ्यांना निलंबित करणे,या सर्व बाबींना मुख्याध्यापक यांनी नकार दिल्याने तसेच मा. शाळान्यायाधिकार व मा.उच्चन्यायालय यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यावर मुख्याध्यापक ठाम
असल्यामुळे संस्थाध्यक्ष गोकुळ यशवंतराव गावंडे, सचिव देवानंद गोकुळ गावंडे व संस्थेचे प्रयोगशाळा परिचर राम यशवंतराव गावंडे यांनी संगनमत करून विद्यालयाच्या आवारात अश्लील शिवीगाळ करून जबर मारहाण केली.या घटनेमुळे मुख्याध्यापक खोटरे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मुख्याध्यापक शशिकांत खोटरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहीहांडा पोलिसांनी संस्था अध्यक्ष गोकुळ यशवंतराव गावंडे, सचिव देवानंद गोकुळ गावंडे व संस्थेचे प्रयोग शाळा परिचर राम यशवंतराव गावंडे यांच्या विरुद्ध कलम ३५२,३५३,३२३,३४१,२९४,५०६,३४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.घटनेपासून तिघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. —– ——–
संस्था अध्यक्ष गोकुळ गावंडे यांनी संस्थेमध्ये मनमानी व नियमबाह्य पणे कार्यवाह्या करून तेथील कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविल्याने,त्यांना काढून टाकल्याने संस्थेच्या विरुद्ध अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यातील बऱ्याच प्रकरणाचा निकाल हा संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाजूने सुद्धा नी लागलेला आहे. —————
संस्थेच्या गैरकारभाराविषयी चौकशी करण्याची मागणी पीडित कर्मचारी करीत आहेत.
