डोक्यावर दगडाने मारहाण केली व बेशुद्ध केल्यानंतर रेल्वे ट्रॅक वर टाकून दिले.!
सिविल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लहान उमरीत परिसरात पेट्रोल पंप जवळ फ्लिपकार्ट पार्सल वाटणाऱ्या युवकावर दोन अज्ञान व्यक्तीने जोर जबरदस्तीने मारहाण करून त्याच्याजवळून 80 हजार रुपये कॅश व ओप्पो मोबाईल कंपनीचा हिसकावून घेतले. तसेच सुरज रवी अग्रवाल याच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली व बेशुद्ध केल्यानंतर रेल्वे ट्रॅक वर टाकून दिले. ही माहिती सुरज यांच्या मित्राला माहित मिळताच त्यांनी रेल्वे ट्रॅक वर धाव घेतली व घटनास्थळी पोहोचून सुरज ला सर्व उपचारा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले व सिविल लाईन पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती दिली. या संबंधित सिविल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिविल लाईन पोलीस स्टेशन करीत आहेत.