मनपा अतिक्रमण विभागाव्दारे पश्चिम झोन, गायत्री नगर येथील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई.
अकोला दि. 11 जुलै 2023 – अकोला महानगरपालिकेच्या पश्चिम झोन अंतर्गत गायत्री नगर येथील अंतर्गत मुख्य रस्त्यावर नागरिकांव्दारे पाय-या, रॅम्प, तार कंपाउंड, ओटे, वॉल कंपाऊंड बांधून अतिक्रमण करण्यात आले होते, यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या प्राप्त तक्रारीवरून आज दि. 11 जुलै 2023 रोजी अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाव्दारे सदरच्या अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त दिलीप जाधव, सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, सहा. अतिक्रमण अधिकारी चद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, कनिष्ठ अभियंता रितेश टेकाडे, मनपा अतिक्रमण विभागातील, क्षेत्रीय कार्यालयाचे आणि अभिकर्ताचे कर्मचा-यांची उपस्थिती होती.