पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील वाशिम बायपास येथे रणजित इंगळे याचे खुन प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस दिल्ली येथून केली अटक!
दिनांक १७,०६,२०२३ रोजी रात्री पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील वाशिम बायपास येथे अनओळखी इसमाने आपली ओळख लपवुन रजित इंगळे राहणार गिता नगर, वाशिम वायपास यांचा खुन केला होता, त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे दिनांक १८.०६. २०२३ रोजी अनओळखी आरोपी विरुध्द अप.क्र. १८९ / २३ कलम ३०२, भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी करून सदर गुन्हयातील आरोपी निष्पन करून आरोपी दिल्ली येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकाने दिल्ली येथे जावुन सदर खुन प्रकरणातील आरोपीस कायदेशिर रित्या ताब्यात घेवुन अकोला येथे आणून पुढील तपासाकरिता नमुद आरोपी यास पोलीस स्टेशन जुने शहर अकोला यांचे ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस स्टेशन जुने शहर करीत आहे,
सदर कारवाई कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप घुगे,अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सुभाष दुधगावंकर यांचे मागर्दशना खाली पोलीस निरीक्षक, प्रदीप शिरस्कार, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल माजिद, रविंद्र खंडारे, पोलीस शिपाई मिनराव दिपके, संतोष दाभाडे, चालक पोलीस अमलदार अदाय बोबडे स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.