अकोला: मनुष्य जीवनातील आंनदासोबत जुळलेलं रहस्य रामचरित मानसमध्ये असून जर प्रत्येक मनुष्याने रामचरित मानस मधील आदर्शांचे पालन केले तर, निश्चितपणे जीवनात सर्वश्रेष्ठ माणसाच्या स्वरूपात आपल्या सामाजिक कर्तव्यांचे निर्वाहन करेल. रामचरित्रमानस हे जीवनाला सात्विक आणि परोपकारी करण्यासाठीचे माध्यम असून, त्याचे अनुकरण मानवताचे जिवंत उदाहरण होईल, असे प्रतिपादन पहिल्या सत्राचे प्रमुख वक्ता आणि उद्घाटक डॉ.शीतलाप्रसाद दुबे यांनी केले.अत्यंत साध्या सोप्या व परिणामकारक शब्द शैलीत डॉ. दुबे यांनी मानवीय गरिमा, सामाजिक तारतम्य, सर्वसामान्यांचे प्रश्न, तर्कशुद्ध, मनोवैज्ञानिक असलेले ‘मनोरम रामचरित मानस’ उलगडून दाखवले.श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत असताना, डॉ. दुबे यांनी हा विषय कधी पुर्ण केला, हे कळलंच नाही
अकोल्यात महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीद्वारे आयोजित या एक दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नीमा अरोरा होत्या. व्यासपीठावर उद्घाटक व मुख्य वक्ता म्हणून महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. शीतला प्रसाद दुबे, अकादमीचे सदस्य आनंद प्रकाश सिंह, सदस्य डॉ. संजय सिंह, जेष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, अकादमीचे सदस्य श्याम पन्नालाल शर्मा, डॉ. प्रमोद शुक्ला, अकादमीचे सहनिदेशक आणि सदस्य सचिव सचिन निंबालकर, मराठी जिला पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब,पत्रकार प्रबोध देशपांडे, बीजीई सोसायटीचे कनिष्ठ उपाध्यक्ष अभिजीत परांजपे उपस्थित होते.
पहिल्या सत्राचे प्रास्ताविक अँड. सत्यनारायण जोशी यांनी केले.
द्वितीय सत्रात ‘जाति, प्रांत, भाषा, धर्मवाद सारख्या संकुचित वृत्तीला नाकारणारी समाज माध्यमं आणि साहित्याचं चिंतन’ या विषयावर मुंबई येथील वरिष्ठ पत्रकार डॉ. संजय सिंह, श्रेष्ठ मंच संचालक आणि साहित्यकार आनंद प्रकाश सिंह व जेष्ठ संपादक किरण अग्रवाल यांनी आपल्या अनुभव आणि व्यापक दृष्टिकोनातून सोशल मीडियाच्या भुमिकेला सामोरे आणले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवर पाहुण्यांना पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उद्घाटन सत्रचे शानदार संचालन प्रा. शारदा बियाणी यांनी केले. दुसऱ्या सत्राचे संचालन डॉ. प्रमोद शुक्ला आणि तिस-या सत्राचे संचालन डॉ. शैलेंद्र दुबे यांनी केले. या साहित्यिक आयोजनाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अकादमीचे सदस्य श्याम शर्मा यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर श्रोते आणि मोठ्या संख्येने महिला प्राध्यापक यांची लक्षणीय उपस्थिति होती. कार्यक्रमात सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.किया गया. प्रारंभ महाराष्ट्र राज्य गीताने आणि राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.