निंबा फाटा येथे माऊली स्वस्त औषधी सेवा मेडिकल मध्ये चोरी!
उरळ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षकांना चोरट्यांची सलामी!
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुका हद्दीतील येत असलेल्या ग्राम निंबा फाटा येथे दिनांक12जुलै रोजी माऊली स्वस्त औषधी सेवा मेडिकल रात्री एक वाजता च्या सुमारा चोरड्यांनी मेडिकल समोरील लाईट स्वेटरचे कुलूप तोडून मेडिकल मध्ये प्रवेश केला .मेडिकल मध्ये ठेवलेले अंदाजे दहा हजार रुपयाची रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
तसेच मेडिकलच्या बाजूला असलेल्या आशीर्वादआग्रो कृषी केंद्र येथे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र चोरट्यांना हे दुकान उडता आले नाही . चोरीचा सर्व घटना क्रम सीसी कॅमेरे मध्ये कैद झाली आहे. सदर दहा वाजताच्या दरम्यानमाऊली स्वस्त औषधी सेवा मेडिकल संचालक हे मेडिकल उघडण्याकरिता आले असता त्यांना आपल्या मेडिकलचे कुलूप फुटलेल्या स्थितीत दिसल्यामुळे त्यांनी घटनेची .माहिती उरळ पोलीस निरीक्षक.गोपाल महादेव ढोले यांना दिली देण्यात आली त्याच वेळी उरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन सदर चोरीचा तपास उरळ पोलीस करीत आहे .
काजी मेहंदी हसन बाळापुर हातरुण