शिवणी खूनप्रकरणातील आरोपीची निर्दोष सुटका!.
अकोला, . 27 ऑगस्ट 2021 रोजी ज्योती खरात या महिलेची संशयावरून हत्या करण्यात आली होती. ही हत्या तिचा पती नितेश खरात याने केल्याची फिर्याद महिलेच्या आईने केली होती. मात्र न्यायालयाने आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार 26 ऑगष्ट 2021 च्या सायंकाळी स्मशानभूमीजवळच्या परिसरात ज्योती खरात हिला मारहाण करण्यात आली होती. आणि त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक
मधुकर महल्ले यांनी आरोपी नितेश खरात याला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी कारागृहात असतानाच खटला चालविण्यात आला. अॅड. पाली यांनी युक्तिवाद केला. प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयाने 7 साक्षीदार तपासले. एक साक्षीदार फितूर झाला तसेच पूर्वीच्या साक्षी आणि प्रत्यक्ष अकोला न्यायालयात दिलेल्या साक्षीमध्ये विसंगती आढळली. तसेच पोलिसांनी सादर केला असलेला पंचनामा संशय निर्माण करणारा असल्याने संशयाचा फायदा आरोपीला देत नितेश खरात याला दोषमुक्त करण्याचा निर्णय दिला. यावेळी .अॅड पाली.अॅड आनंद साबळे, अॅड नागसेन तायडे, अॅड आकाश गाडगे, यांनी काम पाहिले