बोरगाव मंजू परिसरात जोरदार पावसाची हजेरी, खरिपाच्या पेरणीची लगबग
मुग उडीद पिके हातची गेली
शेतकऱ्यांना चिंता, उत्पादन बर्या पैकी होईल, की नाही.
संजय तायडे अकोला तालुका प्रतिनिधी
गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अवेळी व अपुरा पाऊस झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान या वर्षी तरी बर्या पैकी पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती नसताना सुद्धा पेरणी पुर्व मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीची तयारी केली होती, दरम्यान शेती मशागत सह बि बियाणे खरेदी करून मृग नक्षत्रात पेरणी लायक पाऊसाची प्रतिक्षा करत आभाळाकडे डोळे लागले होते, परंतु मृग नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या, दरम्यान उशिरा का होईना गत आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी संध्यस्थितीत खरिपाच्या हंगामात गुंतलेले असुन पेरणीची लगबग सुरू असल्याचे दिसून येते, परिसरात जलसिंचनाच्या सोई सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश शेतकरी निसर्गावर अवलंबून आहेत, तर अल्प प्रमाणात जलसिंचनाच्या सोई आहेत, या वर्षी पेरणी उशिरा सुरू होत आहेत तर कापूस व सोयाबीन,तुर ज्वारी बाजरी मका आदी पिकांची पेरणी सुरू आहेत. नगदी मुग उदीड पिके हातची गेली.
दरम्यान गत काही वर्षांपासून अवेळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे नगदी पिके उडीद व मूग उत्पादन घटले आहे, या वर्षी सुध्दा पाऊस लांबल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या तर आता मूग उडीद पिके हातची गेली आहेत.