गांधीग्राम पुलाच्या निधी अपव्यय व अपहार प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडी ची दहिहांडा पोलिस स्टेशन ला तक्रार…
अकोला दि. १३ वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा वतीने दहीहांडा पोलिस स्टेशन ला गांधीग्राम येथील कोट्यवधी रुपयांचा पुल चुकीच्या पद्धतीने बांधुन शासकीय निधीचा अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावी यासाठी ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या कडे लेखी तक्रार केली.
अकोला अकोट मार्ग हा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे त्यामुळे सामान्य नागरिक विध्यार्थी आणि शेतकरी त्रस्त होते. मात्र सहा महिने उलटून देखील त्यावर काहीही उपाययोजना झाली नाही.उलट तात्पुरती पूल करून वाहतूक सुरू करण्याचा दिखाऊपणा आणि त्याचेही श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात येत असल्याने संतप्त युवा आघाडी मार्च महिन्यात आंदोलन केले होते.सदर आंदोलनामध्ये अकोला जिल्ह्याचे निष्क्रिय खासदार संजय धोत्रे, अकोट विधानसभा मतदारसंघाचे निष्क्रिय आमदार प्रकाश भारसाकळे आणि अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निष्क्रिय आमदार रणधीर सावरकर हे हरविले आहेत ह्यांना शोधून देणाऱ्या ५१ रुपयाचे रोख बक्षीस जाहीर करीत तिन्ही जनप्रतिनिधी चे फोटो सोबत माहिती सार्वजनिक करण्यांत आले होते.हरविलेले जनप्रतिनिधी शोधून आणणाऱ्यास अकोला जिल्हाधिकारी कार्यालया समोर बक्षीस देण्याचे आशयाचे बॅनर आंदोलनामध्ये झळकवले होते.त्यावेळी भाजपचे वतीने तातडीने कधी दोन कोटी तर कधी चार कोटी सांगत तात्पुरता पुलाचे उद्घाटन केले होते.हा पुल टिकणार नाही असे आम्ही स्पष्ट केले होते.
पहील्याच पावसाने रस्त्याचा भराव वाहून गेला आहे.अशा रितीने शासकीय निधीचा अपव्यय शासकीय अधिकारी व जनप्रतिनिधी ह्यांनी केले आहे.अत्यंत बेजबाबदार पध्दतीने हा पुल बांधकाम करण्यात आले असल्याने कंत्राटदार, अधिकारी व जनप्रतिनिधी ह्यांचे विरूद्ध निधीचा अपहार व अपव्यय केल्या बद्दल ४२० ब आणि इतर फौजदारी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे करीता सदर लेखी फिर्याद करण्यात आली.
ठाणेदार यांनी वरिष्ठांशी कायदेशीर मार्गदर्शन घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घोगरे महासचिव राजकुमार दामोदर, सचिन शिराळे, तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, अकोला पुर्व अध्यक्ष जय तायडे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, तालुका प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ,शेखर इंगळे, दिपक ढवळी, कुलदीप सदांशिव, प्रशिस खंडारे,शोभीत आठवले, सतिश निमकर, गोपाल अडबोल, अजय खांडेकर, राहुल आठवले उपस्थित होते.