वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने गांधीग्राम पुलावर जन आक्रोश आंदोलन
अकोट प्रतिनिधी
अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर शासनाने ४ कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या पुलाचा भराव पहिल्याच पाण्यात वाहून गेला व सदर पुल हा पाण्याखाली आल्यामुळे जनतेचे चार कोटी रूपये हे पाण्यात गेले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक १३ जुलै २०२३ ला दुपारी ४.०० वाजता गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर “जन-आक्रोश आंदोलन” करण्यात आले. ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, ओबीसी नेते ॲड संतोष राहाटे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जि. प.अध्यक्ष संगीताताई आढावू, जि. प.उपाध्यक्ष सुनील फाटकर, माजी मनपा गटनेते गजानन गवई, निखील गावंडे, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, दिनकरराव खंडारे, प्रतिभा अवचार, जिल्हा उपाध्यक्ष कविताताई राठोड, युवा महासचिव राजकुमार दामोदर, शिक्षण सभापती मायाताई नाईक, समाजकल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी सभापती योगीताताई रोकडे, जि. प. सदस्य मीनाताई बावणे, सुरेखा सावदेकर, किशोर जामणिक, गोरसिंग राठोड, पवन बुटे, शरद इंगोले, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, दिपक बोडखे, तुषार पाचकोर, बबलु शिरसाट, स्वप्निल सरकटे, मुश्ताक शहा, गोपाल ढोरे, देवानंद तायडे, राजकुमार क्षिरसागर, राजेश वावकार, आनंद डोंगरे, मोहन तायडे, संतोष किर्तक, दिपक सावंग, आतिश शिरसाट, शंकरराव राजुस्कर, वसंतराव नागे, संजय किर्तक, हिरा सरकटे, सुरेंद्र ओईंबे, धिरज देशमुख, भिमराव पळसपगार, निलेश बगाडे, सागर वानखडे, जब्बार शहा, निलय मालधुरे, पंकज दामोदर, शुध्दोधन इंगळे, नितीन सपकाळ, आनंद खंडारे, सुनील सदांशिव, युवराज वानखडे, समाधान बावने, अमित उर्फ पप्पु मोरे, आशिष सोनोने, शंकरराव इंगोले, अक्षय सावंग, विलास सावंग, रंजित सावंग, गोपाल अडबोल, विकास ढवळी, सागर वानखडे, दिनेश सरकटे, पंजाब तायडे, बुद्धभूषण गावंडे, सुधीर देशमुख, अभिजीत गावंडे, चेतन कडू, सुनील वसु, उमेश खंडारे, प्रशांत पेटे, सलीमभाई, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.