शेतात राबणाऱ्या बळीराजा सोबत साजरा केला ह.भ. प .गणेश महाराज शेटे यांनी वाढदिवस
बळीराजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अनोखा उपक्रम
अकोट प्रतिनिधी
कोरोना काळात जगातील सर्व व्यवसाय बंद असताना फक्त शेतकरी राजाचा शेती व्यवसाय चालू होता आणि सगळ्या जगाचे पोट भरण्याचं काम शेतकरी राजा करत होता तर भारत देशाच्या सीमा सुरक्षा करण्यासाठी सीमेवर खांद्यावर बंदूक घेऊन जवान उभे आहेत म्हणून सर्व सामान्य जनता रात्री सुखाने झोपते हेच महत्व तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान चा नारा दिला होता. मात्र या दोघांकडेही राजकारणी फार गांभीर्याने पाहत नाहीत या दोघांच्या कर्तव्याला सलाम करत विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ.प.गणेश महाराज शेटे यांनी यांचा वाढदिवस आगळावेगळा पद्धतीने साजरा केला.बळीराजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी हा अनोखा उपक्रम केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी मनात आले असते तर एखाद्या राजकीय नेत्याच्या सोबत , संत मंडळी सोबत ,शाळेमध्ये ,अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात अशा ठिकाणी वाढदिवस करता आला असता पण या ठिकाणी बरीच मित्र मंडळी वाढदिवस साजरा करताना दिसतात पण बळीराजाचे खरे उपकार देशातील सर्वांवर आहेत बळीराजा रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतात राबराब राबून पोटभर खायला अन्न पिकवतो आणि पुरवतो त्या अन्नदाता सोबत यावर्षीचा वाढदिवस शेतीमध्ये यावर्षी पेरणी केली. त्या सर्व मजूरांना घरी सन्मानाने भोजन देऊन, शाल ,श्रीफळ व त्यांचे पूजन करून वाढदिवस साजरा केला बळीराजाच्या ऋणातून उतराई होण्याकरता सर्वांनीच आपल्या शेतात राबराब राबणाऱ्या शेतकरी राजाचा असाच येथोचीत सन्मान करण्याचा संकल्प करून पाश्चिमात्य चालीरीतीला फाटा देत हा नवीन उपक्रम राबवावा अशी अपेक्षा ह.भ. प. गणेश महाराज शेटे यांनी वाढदिवसाच्या प्रसंगी केली आली.
यावेळी बळीराजा स्वरूपात गजानन सदाफळे, किसनराव गवळी, वासुदेव रामेकर,अजाबराव कुचेकर,मोहन मालवे, माधव मालवे , विठ्ठलराव रामेकर यांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती गजानन मोडक यांनी दिली.