जिल्ह्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सक्षम

जिल्ह्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सक्षम

अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी फुटीचा परिणाम कोणत्याही पद्धतीचा झाला नसून जिल्ह्यात आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सशक्त असून राष्ट्रवादीला पूर्वीचा जनाधार मिळवून देण्याचा प्रयत्न कसोशीने केला जाणार असल्याची स्पष्टोक्ती अनेक नेत्यांनी दिली आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आगमन प्रसंगी शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या फुटीचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले, पक्षात ज्यांनी आपले कर्तबगारी सिद्ध केली नाही, ज्यांना जनाधार नाही अशा पद्धतीचे महाभाग दादांच्या गटात गेले असल्याची चर्चा यावेळी नेत्यांनी व्यक्त केली दरम्यान शरद पवार गटाचे दिग्गज नेते राष्ट्रवादीचे जिल्ह्यात नव्या पद्धतीने मोट बांधण्याची तयारी सुरू केली असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचे संस्थापक शरदराव पवार हे अकोल्याचा झंजावाती दौरा करून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले, अजितदादा गटाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या संदर्भात कटाक्ष रोखला आहे मात्र अजितदादा गटाचा कोणताही परिणाम सहकार क्षेत्रावर होणार नसून उलट सहकार क्षेत्र अधिक गतिमान व सशक्त होणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news