दोन गावठी पिस्तोल ७ जिवंत गोळ्या तसेच दोन धारदार लोखंडी तलवार जप्त!

दोन गावठी पिस्तोल ७ जिवंत गोळ्या तसेच दोन धारदार लोखंडी तलवार जप्त!
तिन आरोपी कडुन १,१३,५००/- रू. मुद्देमाल हस्तगत!
बाळगुन विक्री करणारी टोळी स्थानीक गुन्हे शाखेकडुन आरोपी जेलबंद!

अकोला शहरात संभु राजपुत रा खोलेश्वर अकोला हा बेकायदेशीर पणे अग्नीशस्त्र ( पिस्टल ) व तलवार विक्री करीत आहे .अशि माहीती वरून यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने दोन अग्निशस्त्र एक पिस्टल व रिव्हाल्वर तसेच दोन लोखंडी धारदार तलवार हरी झाडे रा. गौरक्षण रोड़ अकोला व आकाश आसोलकर रा.उमरी अकोला यांना विकल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एक गावठी बनावटीची पिस्टल, एक गावठी बनावटीचे रिव्हाल्वर, ७ राउंड दोन धारदार लोखंडी तलवार असा एकुण १,१३,५००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून संगु राजपुत रा. खोलेश्वर अकोला हरी झाडे रा. गौरक्षण रोड अकोला व आकाश आसोलकर रा.उमरी अकोला यांचे विरुध्द करून पोलिस स्टेशन सिव्हील लाईन व पोलिस स्टेशन खदान येथे कलम ३/२५,४/२५ आर्म्स अॅक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे उपविभागिय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कार, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शनात गोपाल जाधव, सफौ. दशरथ बोरकर, राजपाल ठाकुर, गणेश पांडे, पोहवा. फिरोज खान, गोकुळ चव्हाण, भास्कर धोत्रे नापोका खुशाल नेमाडे, पो.कॉ. आकाश मानकर, अभिषेक पाठक शिरज वानखेडे, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे, पो.कॉ असार शेख, पो. कॉ. स्वप्नील खेडकर यांनी पार पाडली.

2 thoughts on “दोन गावठी पिस्तोल ७ जिवंत गोळ्या तसेच दोन धारदार लोखंडी तलवार जप्त!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news