शरद पवार लवकरच अकोल्या दौऱ्यावर जनतेशी सुसंवाद साधणार !
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे शरद पवार हे लवकरच विदर्भ दौऱ्यावर येणार असून पदाधिकारी व जनतेशी ते सुसंवाद साधणार असल्याचे आश्वासन त्यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना दिले आहे. पक्ष फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच विदर्भ दौऱ्यावर आले होते. आता शरद पवार देखील लवकरच विदर्भात येणार आहेत शरद पवार हे नागपूर नंतर अकोल्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी त्यांना विदर्भ दौऱ्याचे संकेत दिले. पक्षाचे माजी मंत्री अनिल देशमुख सध्या विदर्भात पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. वर्धा, अमरावती, अकोला दौरा त्यांनी केला आहे. जो नेता मृत्यूवर मात करू शकतो, आयुष्यात वाट्याला आलेल्या असंख्य संकटांतून मार्ग काढू शकतो, देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाची दूरदृष्टी ठेवू शकतो, सामाजिक समता, सर्वधर्म समभाव व बंधुभावाच्या विचाराचा जागर करून एकता व अखंडतेच्या ध्येयाने प्रेरित होऊन समाजहिताचे राजकारण करू शकतो, असे नेते शरद पवार यांच्या सोबतच आमच्या निष्ठा व श्रद्धा आहेत. त्यांच्यासोबतच राहण्याचा आमचा निर्धार असल्याचे प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी पक्षाला नवीन चेहऱ्यांची संधी मिळणार आहे.