खदान मलकापूर येथील रस्तावर जीवघेणे खड्ड्यामुळे वंचितचे रुग्णसेवक पराग गवई यांची बेशरम झाड लावून आंदोलन…
संत तुकाराम चौक ते कोठारी खदान मलकापूर रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यावर जीव घेणारे खड्डे पडलेले आहेत या बाबत अगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला व महानगरपालिका अकोला यांना निवेदन देण्यात आले होते परंतु आश्वासना पलीकडे दोन्ही विभाग यांनी रस्त्याच्या समस्ये कडे दुर्लक्ष केले त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला, महानगरपालिका अकोला विभागाचा निषेध करण्याकरिता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरम झाडांचे वृक्षारोपण करून आज रोजी सकाळी 10.30 वाजता अंबिका नगर चौक येथे बेशरम झाडाचे वृक्षारोपणन करण्यात आले. सदरचे आंदोलन वंचित बहुजन आघाडी चे रुग्णसेवक पराग गवई यांच्या नेतृत्वकरण्यात आलय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.