बेकायदेशीर प्राणघातक शस्त्र विकणाऱ्या तिघांना १९ पर्यंत पोलीस कोठडी
अकोला – स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप सिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाळ जाधव व त्यांच्या पथकाने तीन आरोपींना तलवार, पिस्टल, जिवंत काडतुसे यांची खरेदी विक्री करत असताना अटक करून मोठी दुर्घटना टळली आहे या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
अकोला शहरात संमु राजपुत रा. खोलश्वर अकोला हा बेकायदेशीरपणे पिस्टल व तलवार वीक्री करीत आहे अशा माहीती वरून त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने दोन पिस्टल, एक रिव्हाल्वर तसेव दोन लोखंडी धारदार तलवारी आणि ७ राउन्ड हरी झाड़े रा.गौरक्षण रोड व आकाश आसोलकर रा.उमरी अकोला यांना विकल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त बाळगुन विकी करणारी टोळी स्थानीक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करून तिन आरोपी कडुन १,१३,५००/- रु.मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलीसांनी संमु राजपूत रा. खोलश्वर अकोला ,)हरी झाडे रा.गौरक्षण रोड व आकाश आसोलकर रा. उमरी अकोला यांचे विरुध्द करून पोलिस स्टेशन सिव्हील लाईन व
पोलिस स्टेशन खदान येथे कलम ३ /२५,४/२५ आर्मस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली असुन अधिक तपासासाठी त्यांना १९ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.