पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया कटिबद्ध -विनोद बोरे
साप्ताहिक संपादकांचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा उत्साहात
अकोला ता. १८: पत्रकार अहोरात्र कष्ट करून समाजासाठी झटत असतात; पण त्यांच्या हक्क अधिकारासाठी कोणीही लढत नाही. अशा परिस्थितीत व्हाईस आॅफ मीडियाचा जन्म झाला. या संघटनेचे जाळे देशभर विणले गेले असून, ही संघटना पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी केले. ते अकोला येथे आयोजित साप्ताहिक संपादकांच्या कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्यात उदघाटक म्हणून बोलत (ता.१६) बोलत होते.हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाचे विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर होते.प्रमुख उपस्थितीमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय खांडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकळे,
सामाजिक कार्यकर्ते कैलास प्राणजाळे, प्रदीपभाऊ गुरुखुद्दे, जिल्हा क्रीडाधिकारी सतीशचंद्र भट, सहा. माहिती अधिकारी सतीश बघमारे, दत्ता ठाकरे पाटील, एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे, स्वामीनी संघटनेचे अध्यक्ष संजय कमल अशोक, जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, प्रदीपभाऊ चोरे होते.
यावेळी विनोद बोरे म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडियामुळे साप्ताहिक संपादकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.त्यामुळेच साप्ताहिक विभागाचे मोठे संघटन उभे राहिले आहे. व्हॉईस ऑफ मीडिया हा वटवृक्ष बनला असून, संघटनेचे विविध विभाग ह्या फांद्या आहेत.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय खांडेकर म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडियाच्या अनेक विंग आहेत. सर्वच विंग मोठ्या ताकदीने संघटनेचे ध्येयधोरणं राबवत आहेत.यावेळी साप्ताहिक विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर म्हणाले, की अमरावती विभागात साप्ताहिक विभागाची मजबूत बांधणी झाली आहे. लवकरच व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाचे विभागीय अधिवेशन देखील आयोजित करणार आहोत.
प्रा.मुकुंद भारसाकळे म्हणाले, की व्हाईस ऑफ मिडिया ही संघटना वंचितांचा आवाज बनेल,असा विश्वास आहे. सर्व घटकांसाठी काम करुन या संघटनेने व्हॉईस ऑफ इंडिया व्हावे,असेही ते म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. संतोष हुशे म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची ताकद व्हाईस ऑफ मिडियामध्ये आहे. राज्यभरात साप्ताहिकांचे होत असलेले जिल्हा अधिवेशनामुळे साप्ताहिक संपादकांमध्ये उत्साह वाढत आहे.
यावेळी प्रदीप गुरुखुद्दे, संजय कमल अशोक, उमेश अलोणे, सतीशचंद्र भट आदी मान्यवरांची भाषणे झाले. कार्यक्रमाचे आयोजन व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,जिल्हा कार्याध्यक्ष संजय भगवान निकस, उपाध्यक्ष बुडन गाडेकर, डी. जे. वानखडे, सरचिटणीस ़अनिल मावळे, गिरनार हागे, कोषाध्यक्ष पुâलचंद मौर्य, मा.एजाज भाई, सैय्यद जमीर जेके, मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी मिलींद इंगळे, दिपक ताजणे, विधी सल्लागार अॅड. एम. एस. इंगळे, अजय विजय वानखडे,समीर खान, महानगर अध्यक्ष प्रशांत पळसपगार यांनी केले. कार्यक्रमाला अॅड. एकनाथ चक्रनारायण, मनोहर मोहोड, वासुदेवराव चक्रनारायण, ज्ञानदेव खंडारे, रमेश तायडे, रामकुमार खंडारे, अशोक इंगळे, सुजाता ताजणे, सुनंदा वर, लता निकस, वैशाली धरमकर, रोशन गायकवाड, संजना बोरकर, विद्या अंभोरे, मिनाक्षी शेगोकार, विमल खंडारे, कल्पना भटकर, मनिषा भुजाडे, चारुशिला इंगळे यांचेसह शेकडोंची उपस्थिती होते.
प्रास्ताविक संजय निकस पाटील यांनी तर कार्यक्रमाचे बहारदार संचालन साहित्यिक पत्रकार पंजाबराव वर यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बुढन गाडेकर यांनी केले.
-पत्रकारांचा केला सन्मान
यावेळी साप्ताहिक संपादकांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये श्रीमती निर्मलाबाई लक्ष्मण हागे, गायत्रीदेवी प्रकाश शर्मा, विमल जैन, डी. जे. वानखडे, अॅड. एम.एस. इंगळे, संजय कमल अशोक, पराग गवई, उमेश अलोणे,संतोष दाभाडे यांचा सन्मान करण्यात आला.
-गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तक्षशिला बाळासाहेब इंगळे, गुणगुण नाना बोरकर, प्रगती गौतम पडघामोल, आयुष संतोष धरमकर, अब्दुल्ला खान एजाज खान, शोएब बुढन गाडेकर या विद्यार्थ्यांचा य सत्कार भेटवस्तू देवून करण्यात आला.