अकोल्याच्या प्रणव साकला ने मिळविली “ग्रेट ब्रिटेनच्या हुडेर्सफिल्ड विद्यापिठाची डिग्री”
अकोला – शिक्षण क्षेत्रात एक मोठे नावलौकीक मिळवित असलेल्या अकोला नगरातील युवक प्रणव दिपक साकला , रा.खेडकर नगर याने जगातील नामांकीत असलेल्या ग्रेट ब्रिटन मधील हुडेर्सफिल्ड विद्यापीठाची डिग्री मिळवून अकोल्याची शान उंचावली आहे. या विद्यापीठात संपन्न झालेल्या एका भव्यदिव्य समारंभात प्रणव ला ही डीग्री बहाल करण्यात आली. ही डिग्री स्विकारतांना त्याने स्टेजवर येताच “भारत माता की जय”,” जय श्रीराम” अशा घोषणा देवून अनेक गणमान्य विदेशी अतिथी समोर आपल्या देशाचा गौरव केला.
अकोला येथील दिपक ओमप्रकाश साकला यांचा मुलगा असलेल्या प्रणव ने आपले १० वी पर्यंतचे शिक्षण माऊंट कारमेल हायस्कूल मध्ये पूर्ण करून एल.आर. टी. कॉमर्स कॉलेज मधून १२वीची परिक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याने मुंबई च्या आय. टी. एम. विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंटचा ३ वर्षाचा कोर्स पूर्ण केला. मुंबईचे हे विद्यापीठ इंग्लंड मधील विद्यापीठासोबत सलग्न आहे.
त्यानंतर त्याने विदेशात जावून ग्रेट ब्रिटन मधील शासकीय हुडेर्सफिल्ड विद्यापीठातून एम. एस. सी. चा कोर्स पूर्ण करून ही डिग्री प्राप्त केली विशेष म्हणजे मुंबई व यु. के. मध्ये शिक्षण घेत असताना आपल्या पालकांकडून एक रुपयाही प्रनवणे मागीतला नाही. या सर्व शिक्षणा करीता त्याने तेथे काम करून पैसे मिळविले व आपले शिक्षण पूर्ण केले. प्रणव च्या या सुयशाबद्दल अनेकांनी त्याचे व साकला परिवाराचे अभिनंदन केले आहे.