समाजसेवक राम शेगोकार गुरुजी यांनी केला जन्मदिनाच्या दिवशी देहदानाचा संकल्प
प्रतिनिधी /१७ जुलै अकोला – अकोला जिल्हा “नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड ” चे उपाध्यक्ष, प्रख्यात समाज सेवक तथा महानगर पालिकेचे माजी मुख्याध्यापक राम शेगोकार यांनी आपल्या जन्म दिनाच्या दिवशी ” देह दानाचा” संकल्प करून एक आदर्श घालून दिला आहे.
देह हा नश्वर आहे. मृत देहास अग्नीच्या स्वाधिन केल्या नंतर काहीही शिल्लक राहत नाही. परंतु या देहाचे दान केल्यास वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतरही काही गरजुंना त्याचा लाभ मिळू शकतो. या उदात्त भावनेतून आपण देहदानाचा संकल्प केल्याचे राम शेगोकर यांनी सांगितले.
स्थानिक मुकुंद नगरातील रहिवासी असलेल्या शेगोकार यांनी आपाला ८४ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. आज या वयातही अनेक समाजसेवी संस्थांशी सलग्न राहून समाजसेवा करण्याचे त्यांचे व्रत अव्याहतपणे सुरु आहे. त्यांनी स्थापन केलेल्या हास्य क्लब च्या माध्यमातून दररोज सकाळी ते आपल्या मित्रमंडळीस योगा सह आरोग्य विषयक टिप्स देत असतात.