भाजपाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
अकोला – स्थानिक रेल्वे स्टेशन चौक व हरिहर पेठ अकोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाई प्रभाकर वानखडे,सुरेश जाधव व राम खरात यांनी केले होते लोकशाहीर,साहित्यरत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला रेल्वे स्टेशन चौक येथे त्यांचे पुण्यतिथी निमित्त मlल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच हरिहर पेठ येथे पूजन करुन वृक्ष्ररोपण करण्यात आले, कार्यक्रमात भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र कथन करून त्यांचे जीवनावर प्रकाश टाकला.अण्णाभाऊ साठे समाजसुधारक, मराठी लोककवी उत्कृष्ठ लेखक,कामगारांच्या समस्या जगासमोर मांडणारे, समाजाच्या साठी झ्टनारे आपले पूर्ण आयुष्य समाजाला अर्पण करणारे होते असे डॉ अशोक ओळंबे यांनी यावेळी सांगितले,कार्यक्रमाला भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे, शिवसेना शिंदे गटाचे गोपाल नागपुरे भाजपा जिल्हा सदस्य संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्त सुरज साहू,सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सलाम भाई, निलेश बोबडे,भाई प्रभाकर वानखडे,सुरेश जाधव, प्रशिकभाऊ सावळे कालुभाई, गणेश मानकर, प्रकाशभाऊ वानखडे, गणेश आमटे,सादिक कुरेशी अविनास जाधव राघवभाऊ, राम खरात,श्याम खरात, संतोष वाडी,सुरेश वाघमारे, रविंद्र जैन, गजानन गोलाईत यांचेसह कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.