आज वायसीएम सेंटर मुंबई येथे अकोला येथील दिपक सदाफळे (जिवरक्षक) उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित
13 जुलै रोजी मुंबई येथे मंत्रालया शेजारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीन आयोजित पंढरपूर वारीतील सेवेक-यांचा सन्मान सोहळा 2023 मध्ये जिवरक्षक दीपक सदाफळे हे आरोग्य मंत्री मा.श्री.डाॅ.तानाजी सावंत साहेब,महाराष्ट्र राज्य,ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समीती पंढरपूर, मा.श्री. स्वप्नीलजी जोशी सुप्रसिद्ध अभिनेते मुंबई,मा.श्री.संदीपजी पाठक सुप्रसिद्धअभिनेते मुंबई,मा.श्री.राजीवजी खांडेकर संपादक एबीपी माझा मुंबई, मा.श्री.आशुतोषजी पाटील न्यूज 18 लोकमत मुंबई,मा.श्री. शेखरजी मुंदडा अध्यक्ष महा एनजीओ फेडरेशन मुंबई,मा.श्री.संजयजी भोकरे संघटक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मा.श्री.कीरणजी जोशी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मा.श्री. पंकजजी बीगवे पुणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्याहस्ते शाॅल,श्रीफळ,सन्मान चिन्ह,आणी माणाची तुळस कुंडी,देऊन उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2013 पासुन (जिवरक्षक)दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी वारीत ईओसी वाळवंट परीसर आणी चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन सेवा आणी सुरक्षा उत्कृष्टपणे देत असतात या मध्ये त्यांनी वारीत वाळवंट ईओसी परीसरात सेवा देत असतांना चंद्रभागेच्या पात्रात 35-40 वारक-यांचे प्राण वाचविले आहेत आपात्कालीन घटना घडणार नाही याची काळजी घेऊन ते वाळवंट सह चंद्रभागेच्या पात्रात रेस्क्यु बोटीद्वारे सुरक्षा व सेवा चोखपणे बजावत असतात याच प्रमाणे गेली 23 वर्ष झाले अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रात आपात्कालीन घटनांमध्ये निष्काम सेवा देऊन अख्या महाराष्ट्रात आपल्या आपत्ती व्यवस्थापन सेवेतुन दिपक सदाफळे यांनी समाजातील घटकांपासुन तर विविध प्रशासकीय विभागांसह राजकीय क्षेत्रातील सर्वांच्या मनामनात आपले नाव कोरले आहे.
विशेषतः म्हणजे शासकीय निधी न घेता मानधनाची अपेक्षा न करता असे देवरुपी कार्य करणा-या या अवलीयाने सोबतच आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा आणी सेवा सोबतच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरे,जणजागृतीसह ते लोकांना सावध,सतर्क करण्याचे काम ते सातत्याने करतात. घेतलेल्या माहीती वरुन त्यांनी गेली 23 वर्षात अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणी उत्तराखंड,माळीण,सह विविध जिल्ह्यातील विवीध आपत्कालीन घटनांमधील शोध व बचाव कार्यात सहभाग घेऊन आज पर्यंत त्यांनी 6728 नागरिकांना जिवनदान दीले याच पद्धतीने सर्च ऑपरेशन राबवुन विवीध आपत्कालीन घटनांमधील बेपत्ता असलेल्या 3921 मृतदेह शोधुन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दीले.यांच्या कडे अत्याधुनिक शोध व बचाव साधन सामग्री आणी 3 रेस्क्यु बोटसह दोन रुग्णवाहीका उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र 85 शाखांसह 3591 स्वयंसेवक उपलब्ध आहेत असे आगळे वेगळे कार्य करणा-या देवदुतांचे कार्य हे देशाला प्रेरणादायी व उल्लेखनीय,प्रशंसनिय आहे जिवरक्षक सेवा, रुग्णसेवा,आपत्ती व्यवस्थापन सेवा आणी सुरक्षा रस्ते अपघात, पोलीस घटनांमध्ये मदत करण्यासाठी दीपक सदाफळे यांनी त्यांचे परीवारासह या देवरुपी सेवेत समर्पित करून ते निस्वार्थपणे जिवन जगताहेत याच कळीचा धागा पकडून सेवेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने या दिमाखादार सोहळ्यात जिवरक्षक दिपक सदाफळे यांना निमंत्रीत करुन मान्यवरांचे हस्ते सन्मानित केले.यावेळी जिवरक्षक दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार यांचे उपस्थितीत मंडळींनी टाळयांच्या व टाळ मृदंगांच्या गजरात स्वागत केले.या कार्यक्रमात महाराष्ट्रातील उस्मानाबाद,सोलापूर, पंढरपूर,अहमदनगर, पुणे सातारा,विविध जिल्ह्यातील व विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री. कीरण जोशी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप चव्हाण म.रा.म. प.संघ यांनी केले अशी माहिती आयोजन समीती संदीप चव्हाण यांनी दीली आहे.