सावधान ! शहरातील या उपहारगृहात नागरिकांना दिल्या जाते गटारीचे पाणी
– नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ; अन्न औषध विभाग गाढ झोपेत
अकोला :- शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून परिचित असलेल्या दुर्गा चौक परिसरातील मोरया नास्ता कॉर्नर येथे ग्राहकांना पिण्यासाठी चक्क गटारीचे पाणी दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकाराची एका जागरुक नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रफीत कैद केल्याने बिंग फुटले आहे. संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या परिसरात एम एस ई बी चे कार्यालय असून तिथे मोठ्या प्रमाणात चहा टपरी तसेच नाश्त्याचे हॉटेल आहेत. इथे सुद्धा या पाण्याचा उपयोग केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संबंधित वाला गेल्या कित्येक दिवसापासून लिकेज असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. अमृत योजनेचे सुद्धा पितळ उघडे पडल्याचे दिसून येत आहे. संबंधित वालमुळे नागरिकांच्या नळाला नालीतील पाणी सुद्धा दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करून वाल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.