पोलीस विभाग आणि स्थानिक जनता याच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील
– मा.संदीप घुगे पोलीस अधीक्षक
दिनांक १९/०७/२०२३ रोजी ११.०० वा. निमवाडी पोलीस वसाहत हॉल येथे अकोला जिल्हयातील पोलीस पाटील यांचा मेळावा चे आयोजन अकोला पोलीस दला तर्फे करण्यात आले होते. पोलीस पाटील हे गावातील पोलीस विभागाचा महत्वपूर्ण घटक आहेत. जर एखाद्या वेळेस गावामध्ये खून, दरोडा, आकस्मिक मृत्यू, किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा इतर बाबी घडल्यास पोलीस पाटील हे त्याची प्राथमिक माहिती घेऊन ही माहिती पोलीस स्टेशनला कळविण्याचे काम करीत असतात. पोलीस पाटील हे महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांना संपर्क करून गावातील विविध समस्या तसेच अनिश्चित घडणाऱ्या घटना सोडवित असतात, त्याच प्रमाणे गावात अनोळखी संशयास्पद व्यक्ती आल्यास त्यादी माहिती पोलीस पाटील हे पोलीस विभागाला देत असतात. एकंदरीतच पोलीस पाटील हे पोलीस विभाग व प्रशासकीय विभाग यांच्या मधील दुवा आहेत, असे मत आजच्या पोलीस पाटील मेळावा प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांनी मांडले.
पोलीस पाटील मेळाव्याला मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी अकोला जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीमधील २५० पोलीस पाटील उपस्थित होते, गाव पातळीवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल, पोलीस पाटील नंदकिशोर महल्ले दुधलम, सुनील खाडे आळंदा, राजेश ठोकड जाम बु, सुजय देशमुख रिधोरा, विजय सरदार चतारी, हितेश हाणे अडगाव, विजय खवले उमरा, गजानन गावंडे हिरपुर, प्रमोद लांडे धनेगाव, सविता भांगरे सुकळी, वनिता बोचरे नांदखेड, ज्योती आढे गोपालखेड, विजया शेगोकार पाथर्डी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमामध्ये पोलीस पाटील विजय सरदार, अशोकराव तायडे, गजानन पारधी, अरुण तायडे यांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अभय डोंगरे यांनी आपले विचार व्यक्त केले. मा. रितू खोकर मॅडम सहायक पोलीस अधीक्षक अकोट विभाग यांनी मेळाव्या घेण्याचा उद्देश समजावून सांगत आपले मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला सहायक पोलीस अधीक्षक बाळापूर विभाग, मा. गोकुळ राज जी उपविभागीय पोलीस अधीकारी मूर्तिजापूर विभाग मा. श्री. मनोहर दाभाडे, राखीव पोलीस निरीक्षक पो.मुख्यालय मा. श्री. श्रीधर गुलसुंदरे यांची उपस्थिती होती आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक मा. श्री. नितीन देशमुखा प्रभारी जिल्हा विशेष शाखा अकोला यांनी केले तर सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले कार्यक्रगावी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली..