भौरद गायगाव वरुण जाणाऱ्या पुलावरून दोन ते तीन फूट पाणी जात असताना सुद्धा करीत आहेत प्रवास!
मनोज माने सत्य लढा न्यूज – भौरद गायगाव वरुण जाणाऱ्या पुलावरून दोन ते तीन फूट पाणी जात असताना सुद्धा प्रवासी जीव धोक्यात घालून पूल ओलांडून करीत आहे प्रवास. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वीकडे मोठ्या प्रमाणात नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून. भौरद गायगाव जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याला मोठ्या प्रमाणात त पाणी आल्यामुळे हे पाणी पुलाच्या तीन फूट वर असल्यावर सुद्धा दुचाकी स्वारग तसेच गायगाव डेपोला जाणारे डिझेल पेट्रोल टँकर पूल ओलांडत असून. यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची संभावना नाकारता येत नसून. या ठिकाणी या नाण्याला पूर आल्यास हा रस्ता बॅरिकेट लावून बंद करण्याची मागणी सामान्य नागरिका कडून होत आहे.