अकोला शहरातील गौरक्षण रोड येथे असलेल्या शिवरत्न ज्वेलर्स काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे. दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, त्याचवेळी दुकान मालकाची मोटारसायकलही लांबवलीय. खदान पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. काल रात्री अज्ञात आरोपीनी खदान पोलीस स्टेशन अंतर्गत गौरक्षण रोडवर असलेल्या शिवरत्न ज्वेलर्समध्ये दुकानात ठेवलेले सोन्या- चांदीचा ऐवज लंपास केला. पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी आधी दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली आणि नंतर दुकानात लावलेले कॅमेरे आणि डीसीआरही चोरट्यांनी पळवून नेला.
शिवरत्न ज्वेलरीचे संचालक सुरेंद्र विसपुते यांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी त्यांच्या दुकानातील सुमारे ५ ते ७ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी खदान पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळाची ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासह फिंगरप्रिंट तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. पाहणी करून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असला, तरी सदरील दागिन्यांचे दुकान आहे. मुख्य रस्त्यावरून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची ये-जा सुरूच होती. परंतु काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अशात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत ही चोरीची घटना घडवून आणल्याची चर्चा सुरू होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.