स्थानिक गुन्हे शाखाने पकडला लाखो रुपयाचा प्रतिबंधित गुटखा!
स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. मुकुद देशमुख यांना दिनांक १९ जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारावर पांढऱ्या रंगाच्या ईनोवा गाडी क्रमांक MH 43 AL- 2064 या वाहनात नवा अंदुरा येथील हरीओम उर्फ ओम उमेश कराळे, वय २१ वर्ष, अमोल रवि तायडे, हे दोघे मिळून प्रतिबंधित सुंगधीत गुटखा स्वतःच्या फायदया साठी विक्री करीता घेवून येत आहे. असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाल्याने त्यांचे पथकातील अमलदार व पंचासह ग्राम नया अंदुरा येथे नाकाबंदी करून वाहन थांबवुन झाडझडती घेतली असता वाहनातून प्रतिबंधित गुटखा जप्त करून वरील आरोपी जवळून विविध प्रकारचा शासनाने प्रतिबंधीत केलेला आरोग्यास अपायकारक गुटखा व इनोवा गाडी असा एकूण १४,७३,९२५ मुद्देमाल जप्त करून आरोपीतांन विरुद्ध पोलीस स्टेशन उरळ येथे अप.क्र. २८४/२३ कलम ३२८,१८८, २७२,२७३, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे सायक पोलीस निरीक्षक, प्रदीप शिरस्कार यांचे मागर्दशना खाली पोउपनि मुकुद देशमुख, पोलीस हवालदार. दत्ता ढोर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल मोरे, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.