खडकेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने समाजातील गरजू विध्यार्थ्यांना लेटर बुक वाटप
नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेले खडकेश्वर गणेशोत्सव मंडळ यांनी पुन्हा एकदा आपले नाविन्यपूर्ण उपक्रमातून समाजातील दुर्बल घटक जे शिक्षणाचा आर्थिक भार सोसावू शकत नाहीत अशांना मदत करून पुन्हा एकदा समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
खडकेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाचे सदस्यांनी शाळेचा आर्थिक भार सोसवू शकत नसले पाल्य यांना लेटर बुक वाटप केले जेणेकरून अत्यंत हलालकीच्या परिस्थितीत जगणारे यांचे कुटुंब त्यांच्यावरील शिक्षणाचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होईल या उद्देशाने मंडळाच्या सदस्यांनी हा उपक्रम राबविला सदर उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.